नाशिक : प्रतिनिधी
भारतीय योगशिक्षक महासंघाच्या नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पंचवटीतील त्रिकोणी बंगला परिसरात झाली. महासंघाचे राष्ट्रीय सचिव व राज्य उपाध्यक्ष राहुल येवला यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष यू. के. अहिरे होते.
महासंघाच्या नाशिक जिल्हा कार्यालयाचे २४ डिसेंबरला
उद् घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची माहिती व लगेचच २५ व २६ डिसेंबरला होणाऱ्या राज्यस्तरीय १ ल्या महायोग संमेलनाच्या पूर्वतयारीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच त्यांनी नुतन कार्यालयाची पाहणी केली. याप्रसंगी उपाध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील यांनी स्वागत केले. डॉ. योगेश सदगीर यांनी आभार मानले.
–