स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीची विश्वधर्माच्या साच्यात लेणी कोरली : योगाचार्य प्रा. राज सिन्नरकर

0
नाशिक : प्रतिनिधी
मानवतेच्या कल्यासाठी ईश तत्त्वाचे अवतरणे होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म नाही व मृत्यूही झाला नव्हता. या काळात त्यांनी पृथ्वीला भेट दिली व जगाच्या अनिष्ट काळात भारतीय संस्कृतीची विश्वधर्माच्या साच्यात लेणी कोरली, असे प्रतिपादन योगाचार्य व प्रेरणादायी वक्ते प्रा. राज सिन्नरकर यांनी व्यक्त केले.
यांची उपस्थिती    
स्वामी विवेकानंद  – युगपुरुष या विषयावर प्रा. सिन्नरकर बोलत होते. योग विद्याधाम (शिरपूर) यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डाॅ. श्रीकांत वाडिले व वर्षा वाडिले उपस्थित होते.
कधीतरी हे महापुरूष जन्माला येतात
   प्रा. सिन्नरकर यांनी स्वामी विवेकानंद यांची लहानपणापासूनची जडणघडण ते त्यांचे कार्य व्याख्यानातून मांडले. ते म्हणाले की, युगायुगातून कधीतरी हे महापुरूष जन्माला येतात. ते प्रत्यक्ष शिवाचा तेजस्वी अवतार आहेत. भारताची परिक्रमा, रामकृष्णांचा सहवास व प्राचीन ग्रंथांचा अभ्यास यातून स्वामी विवेकानंद घडले. त्यांनी कालिमातेकडे मागताना ज्ञान, भक्ती, वैराग्य, विवेक मागितला. त्यांच्या उत्तर आयुष्यातील मानवतेविषयी कळवळा, याची बिजे त्यांच्या लहानपणातच होती. स्वामी विवेकानंद म्हणत, संपूर्ण जगाला मोक्ष प्राप्त होत असेल तर मी हजार वेळा नरकात जायला तयार आहे. असा जग बदलवणारा माणूस स्वतः किती संकटे झेलतो हे अनुभवले पाहिजे.
                     आयोजक  – डाॅ. श्रीकांत वाडिले
एक पाऊल तरी टाका
     स्वामी विवेकानंद वाचून उपयोग नाही. ते अनुभवले पाहिजे. स्वामी विवेकानंद जगले पाहिजे. त्यांच्यासारखे एक पाऊल का होईना टाकले पाहिजे, असाही प्रा. सिन्नरकर यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.