नाशिक : प्रतिनिधी
राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित योगासने, ध्यान व शास्त्रशुद्ध प्राणायाम वर्गास मंगळवारपासून (दि.4) सुरूवात झाली.
विकारमुक्त शरीर आणि मनाच्या एकाग्रतेसाठी हा परिपूर्ण योगाभ्यास असल्याचे संयोजकांनी सांगितले. 28 जानेवारीला या वर्गाचा समारोप होईल. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 वाजता ते 7 वाजेपर्यंत हा वर्ग भरेल.
या वर्गाचे स्थळ असे : राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, तिडके कॉलनी, एसएसके हॉटेलजवळ, नाशिक. या वर्गात योगाभ्यास, सूर्यनमस्कार, ध्यान व प्राणायामाचा अभ्यास घेण्यात येणार आहे.
या वर्गाचे वैशिष्ट्ये म्हणजे मान, पाठ व कंबरेचे विकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, हदयविकार, पोटाचे विकार, श्वसन संबंधित विकार, मानसिक संतुलन, मनाची एकाग्रता यावर योगप्रक्रीया उपयुक्त आहेत. या महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हा प्रभावी असा वर्ग आहे.
या वर्गात प्रवेशासाठी सचिन बागडे (9226929292), श्रीराज पांडे (8657551676), संजय चौधरी (9890020100) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
—