योगा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या नाशिक जिल्हा समितीतर्फे नाशिक जिल्हा योग संमेलन नाशिक येथे 17 मार्चला होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी राहुल बी. येवला यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त नियोजित अध्यक्ष येवला यांच्या कार्याचा परिचय…
श्री. राहुल (अंबादास) भिलाजी येवला हे शैक्षणिक दृष्ट्या उच्च विद्याविभूषित आहेत. आज योगशास्त्रातील त्यांचे कार्य हा त्यांचा श्वास बनला आहे. योगशास्त्रातील शिक्षणाच्या सर्व पायऱ्या पूर्ण करत एम. ए. (योगशास्त्र), योग अध्यापक पर्यंत त्यांचे औपचारिक शिक्षण झाले आहे. तसेच ते राज्य व राष्ट्रीय योगासन क्रीड़ा स्पर्धा परीक्षक म्हणून कार्य करत आहेत. ते उत्तम साधक व कुशल संघटक आहेत. सर्वसमावेशक घेऊन चालण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे.
योग हा त्यांचा आवडता विषय असून योगाच्या प्रचार- प्रसारा सोबतच समाजातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी योगाच्या माध्यमातून नेहमीच मार्गदर्शन करतात. तसेच त्यांचा विद्यार्थी हा एक आवडता व जिव्हाळ्याचा विषय असून योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य सक्षम व सुदृढ ठेवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
चांदवड मालेगाव हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. चांदवड येथील एसएनजेबी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल मध्ये योग एक्सपर्ट म्हणून ते कार्यरत आहेत.
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मूल्य ते जगतात. 1998 पासून त्यांनी योग कार्याचा वसा घेतला आहे. शिरोधार्य हे व्रत त्यांनी जपले आहे. त्यांच्या या अंगीकृत कार्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत. याचबरोबर वाचन लेखन हे छंदही त्यांनी ठेवले आहेत. आज ते सात ते आठ संस्थावरती कार्यकर्ता म्हणून मार्गदर्शन करतात. याची दखल घेऊन त्यांना मानाचे जवळजवळ अकरा पुरस्कार व इतर अनेक सन्मान लाभले आहेत.
करोनाच्या (पंडेमिक) काळात प्रयत्नपूर्वक जलनेती अभियान चांदवड तालुका व नाशिक जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले. यामागे आयुष मंत्रालय, डॉ. विश्वास मंडलिक, शिवानंद महाराज, यांची प्रेरणा होती. नाशिक जिल्हा योग समिती कडूनही हे कार्य त्यांनी करून घेतले. शाळा कॉलेज लोकप्रतिनिधी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आणि यांचे अनुभवही लोकांना चांगले मिळाले. हजारो लोकांनी याचा लाभ घेतला. ही एक उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.
योगायोग असा की राहुल बी. येवला यांच्या योग कार्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत. ही त्यांची फार मोठी उपलब्धी आहे.
योगाचार्य अशोक पाटील, नाशिक
मो. 93715 19747