नाशिक : प्रतिनिधी
योग विद्या गुरूकुलतंर्गत येथील योग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवरील योगासन स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. विष्णू ठाकरे व कांचन उफाडे यांची राष्ट्रीय पातळीवरील योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र योगा असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धा – 2022 ही श्रीरामपूर (जि. नगर) येथे झाली. यात विद्यार्थी विष्णू रामेश्वर ठाकरे याने 21 ते 25 वयोगटात रौप्य पदक प्राप्त केले. त्याने पूर्ण धनुरासन, दंडयमन जानूशिर्षासन, नटराज, कौण्डीयान, सेतूबंध चक्रासन, हनुमान, उठ्ठीत पश्चिमोत्तानासन, कुर्मासन ही आसने केली. 35 ते 45 या वयोगटात कांचन उफाडे यांनी कास्य पदक प्राप्त केले.
फिरोजपूर (पंजाब) येथे नोव्हेंबर, डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय पातळीवरील योगासन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत ठाकरे व उफाडे हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.