नाशिक : अल्पावधीसाठी दुचाकी दिली नाही या कारणातून चार जणांच्या टोळक्याने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना राजीवनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. माधुरी भालेराव, गजानन भालेराव,उमेश भालेराव, सुनिल भालेराव अशी मारहाण करणा या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी रवी केशव भगत (१९ रा.बडदेनगर, सिडको) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. भगत सोमवारी (दि. १५) राजीवनगर येथील रूंग्ठा बिल्डरच्या साईटवर गेला होता. यावेळी संशयीतांनी त्याच्याकडे जवळच जायचे आहे असे म्हणून दुचाकीची मागणी केली. मात्र भगत याने आपली मोटारसायकल देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त टोळक्याने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत भगत जखमी झाला असून जमादार हादगे अधिक तपास करीत आहेत.
—
दुचाकी न दिल्याने तरूणास मारहाण
Get real time updates directly on you device, subscribe now.
Prev Post
Next Post