नाशिक : प्रतिनिधी
कवी प्रा. शरद देशमुख लिखित ‘पोस्टर’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. २०) सायंकाळी चार वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहासमोरील आयएमआरटी हॉलमध्ये होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुभाष देशमुख असतील. प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र माजी संचालक कृष्णाजी भगत, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर अहिरे उपस्थित राहणार आहेत. या वेळी कवी संजय चौधरी, डॉ. वेदश्री थिगळे, प्राचार्य डॉ. विलास देशमुख मार्गदर्शन करतील. प्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हर्षल देशमुख यांनी केले आहे.
—