नाशिक : प्रतिनिधी
येथील किरण सुभानराव गोविंद यांना मुंबई विद्यापीठाने तत्वज्ञान विषयात पीएच. डी. (आर्टस्) नुकतीच प्रदान करण्यात आली.
गोविंद यांनी व्हॅल्यू एज्युकेशन नीड ॲण्ड चॅलेंजेस – क्रिटीकल स्टडी या विषयावर प्रबंध सादर केला होता. सहायक प्रा. डाॅ. नारायण गदादे हे या विषयासाठी संशोधन मार्गदर्शक म्हणून होते. तसेच त्यांना डॉ. कांचना महादेवन यांचेही मार्गदर्शन लाभले.
—