रचनात्मक विचारांची शक्ती – भाग 2

0

रचनात्मक विचारांची शक्ती

या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी किंवा आपल्यात जुनी विचारधारा (core thoughts) कोणती आहे ते समजून घेण्यासाठी, आपण सध्या कोणत्या विचारधारेने जगतो आहोत? हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. आपले जुने बंध आणि अडथळे शोधावे लागतील. त्यावर काम करावे लागेल, मग आपण रचनात्मक विचार करू शकू आणि त्यांची शक्ती ओळखू शकू.

नवीन मिळविण्यासाठी आपण जुने सोडलेच पाहिजे. जुन्याच्या नजरेत अडकून राहू नका, जुन्यातून (भूतकाळातून) शिकून आपला आज (वर्तमान) सुधारायचा आहे, तरच उद्या (भविष्य) आपल्या हातात येईल. जसे सामान्य झाडही वर्षातून एकदा शरद ऋतूत आपली सर्व पाने गळून नवीन होण्याचा प्रयत्न करते. नवीन पानांसह नवीन आणि हिरवे दिसते. हेच सूत्र आपल्यासाठीही काम करते.

आपणही जुना विचार आणि प्रवृतींपासून मुक्त होऊन झाडासारखा रचनात्मक विचार केला पाहिजे, तरच आपल्यासाठी प्रगतीची नवी दारे उघडू शकतात. जुने निघून जाणे आणि नवीन येणे हा जीवनाचा क्रम व निसर्गाचा नियम आहे. ही नवीन विचारधारा आपण मनापासून स्वीकारली, तर आपल्यासाठी एक नवा मार्ग खुला होईल, जो नवीन आणि रचनात्मक शक्यतांनी परिपूर्ण असेल. हाच मार्ग आहे, जो रचनात्मक विचारांच्या सामर्थ्याने आपल्या जीवनाचे ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरू शकतो.

नवीन कल्पनांसह, नवीन प्रयोग, नवे परिणाम देतील. एखाद्या दिवशी ऑफिसला जाण्याचा आणि येण्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करा. जे काम आपण एकाच प्रकारे करत आहोत, तेच काम वेगळ्या प्रकारे करायचा प्रयत्न केला, तर असा नवीन बदल करून पाहिल्याने जागरूकता वाढते. ह्यामुळे शक्यतांचे जग उघडते. अशा प्रयोगातूनच तुम्हाला रचनात्मक विचारांची ताकद खोलवर कळायला लागेल. ही शक्ती या रचनात्मक विचारांमध्ये आहे. हे आपण ओळखले पाहिजे आणि या विचारांनी आपली ओळख झाली पाहिजे. मग आपण जीवन आणि स्वतःला ओळखण्यास सक्षम होऊ. जेव्हा तुम्ही स्वतःलाही ओळखता, तेव्हाच तुम्ही इतर सहकारी आणि जगाला ओळखू शकाल, अन्यथा “मी जग ओळखले आहे” या भ्रमात जगत राहाल. या भ्रमातून बाहेर पडण्याचा एकच सोपा मार्ग आहे आणि तो मार्ग आहे, स्वतःची एक विचारांची पद्धत असावी. त्या विचारांमध्ये स्पष्टता हवी आणि त्यावर सातत्याने चालत राहावे, तरच आपल्याला एक साधा आणि सोपा मार्ग ओळखता येईल. हे रचनात्मक विचारशक्तीचे रहस्य आहे.
(उत्तरार्ध)

लेखक – खोजी पुरुषोतम सावंत (एम. ए. पत्रकारिता / योगशास्त्र)
फोन: ९५६१०३१७९२
Email – purushottam16want@gmail.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.