प्रत्येक मानवाला निसर्गाकडून विचारशक्ती मिळालेली आहे. ही शक्ती फक्त मानवालाच मिळालेली आहे. प्राणी विचार करू शकत नाहीत, काहीही न करता मानवाला श्वास घेता येतो. त्याचप्रमाणे आपले विचार देखील श्वासाप्रमाणे सतत चालू असतात.
चालणाऱ्या श्वासाला ज्यांनी दिशा दिली त्यांना आरोग्य सापडले आणि श्वासाला दिशा न देणाऱ्यांचे आरोग्य हरवले. श्वसनावर नियंत्रण करणाऱ्यांनी आरोग्याची अनेक गुपिते शोधून काढली आहेत.
त्याचप्रमाणे माणसाने चालणाऱ्या विचारांना दिशा दिली तर त्यांना जीवन जगण्याचे निश्चित ध्येय व उद्दिष्ट प्राप्त होते आणि त्यांची चेतना योग्य दिशेने कार्यान्वित होते.
विचारांची शक्ती कोणत्या गोष्टी आकर्षित करत आहे, हे महत्वाचे आहे. आपण कोणत्या विचारांनी भरलेले आहोत, त्यानुसार ते आपल्याला मिळते. निसर्गाचा नियम असाच चालतो, तो समजून घेणे खूप गरजेचे आहे. जर आपण एखाद्या गोष्टीसाठी बनवलेले किंवा बनवले गेलो तर तेच आपल्याला मिळते. म्हणूनच आपल्याला निसर्गाने बनवण्याची संधी दिली आहे. म्हणून आपण सकारात्मकतेसाठी एक साधन बनले पाहिजे. जर आपण नकारात्मक विचारांनी भरलेले असू तर, तेच विचार आपल्यासाठी शाप ठरतात आणि जर आपल्यात सकारात्मक विचार असतील तर तेच विचार आपल्यासाठी वरदान ठरतात. आपल्या आजूबाजूला सकारात्मक विचारांची माणसे हवी असतील तर आधी आपण आपली संपूर्ण विचारसरणी सकारात्मक बनवली पाहिजे, तरच ते शक्य आहे.
आज आपले विचार कसे आहेत? सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचे परिणाम काय होतात? हे आपण पाहिलं पाहिजे. रचनात्मक विचारांच्या कल्पना कशा करायच्या? जशी एखादी वस्तू कारखान्यातून बाहेर पडून बाजारात येते, तशी ती नवीन असते, पण प्रत्यक्षात ती तशी नसते. जोपर्यत उत्पादनामध्ये सर्व वैशिष्ट्ये जोडण्याची शक्यता असते, तोपर्यंत त्याला नवीन म्हणता येणार नाही. जुनी बाईक पाहून आपण म्हणतो “ती जुनी बाईक आहे. त्या जुन्या बाईकमध्ये आधुनिक बाईकपेक्षा उच्च तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये नाहीत असे आपण कोणत्या कारणासाठी म्हणतो. त्या बाईकमधील उरलेल्या सर्व शक्यता ‘अप्रकट आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती एखादा पदार्थ खातो तेव्हा त्याला त्या पदार्थामध्ये लपलेल्या शक्यता दिसतात, ते म्हणजे रचनात्मक विचार शोधणे होय.
रचनात्मक विचारांची शक्ती आपल्या जीवनात कशी कार्य करते. हे समजून घेणे आणि पाहणे खूप महत्वाचे आहे. नवीन विचाराद्वारे आपण रचनात्मक विचारांची शक्ती समजू शकतो आणि त्याचे परिणाम देखील पाहू शकतो. प्रत्येकाला महान भौतिकशास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन माहीत आहे, पण आम्ही त्यांच्या रचनात्मक विचारांची शक्ती समजून घेत नाही. आपल्या रचनात्मक विचारांच्या शक्तीवरच त्यांनी आपल्या क्रांतिकारी वैज्ञानिक आविष्कारांनी जगाला मंत्रमुग्ध केले आहे.
न्यूटनला न्यूटोनियन भौतिकशास्त्राचे संस्थापक देखील मानले जाते. न्यूटनची विचारसरणी इतर लोकांपेक्षा वेगळी होती, त्याची विचारसरणी रचनात्मक होती, म्हणून त्याने गुरुत्वाकर्षणाच्या उपस्थितीचा नियम जगाला दिला. न्यूटनने आपल्या जीवनाला आणि जगाला न्यूटर्न (नवीन वळण) दिला आहे. म्हणूनच हे जग त्यांचे ऋणी आहे. (पूर्वार्ध)
— खोजी पुरूषोत्तम सावंत, नाशिक
मो. नं. – 9561031792
मेल आयडी – purushottam16want@gmail.com