निसर्गोपचारात ध्यानाचे महत्त्व

0

मानवी मन हे अस्थिर व चंचल आहे. याच्या कोंदनामध्ये  कितीतरी विचार आणि विकार भरलेले असतात. याचा परिणाम आपल्या फिजिकल बॉडीवर होत असतो. चांगल्या विचारांचा व वाईट विचारांचा दोहोंचा परिणाम शरीर स्वीकारत असते. दिवसातून जवळ-जवळ 60 प्रकारचे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत असतात. यातूनच मनाने उत्पन्न केलेले काही आजार जडत असतात त्यांना psychosomatic disease असे म्हणतात. मग हे आजार चघळण्याची सवय लागते. Consciousness वाढतो. यातून व्याधी जडतात आणि वाढतात. यातून बरे होण्याचा मार्ग योगामध्ये ध्यानाने सांगितला आहे. ध्यानाच्या अंगाने मनामध्ये चांगले विचार पेरता येतात. किंवा निर्विचार तरी होता येते.

गालिबचा एक शेर आहे
” उम्रभर गालीब  यही भूल करता रहा
धुल उनके चेहरेपे थी
वह आयना साफ करता  रहाl”
अशीच गत आपली झाली आहे. आपल्या मनातच विचारांची धूळ इतकी आहे की, ती आपण साफ करतच नाही. ही धूळ साफ करण्यासाठी ध्यान हाच एक उत्तम मार्ग आहे.
अनेक योग परंपरेत ध्यान शिकविले जाते. ध्यान म्हणजे मनाची निर्विचार अवस्था. यासाठी मनाला गुंतवण्यासाठी काहीतरी खेळणे द्यावे लागते. बहुतेक संप्रदायात मनाला गुंतवण्यासाठी अनेक पद्धती आहेत.भगवान शिवाने जवळ जवळ112 पद्धती सांगितल्या आहेत. यासाठी काही नामस्मरणाचा, जपाचा व चिंतनाचा मार्गही सांगितला जातो. हे मनाच्या हाती खेळणे देणेच होय. त्याच्यातच मन अडकून ठेवावे लागते. ध्यान म्हणजे परिपूर्ण चिंतनाचे फळ आहे. त्यात अनंताचा शोध घेण्याची कला आहे. मनाकडे व शरीराकडे साक्षीभावाने पाहणे होय. त्याचप्रमाणे श्वासोच्छ्वासाकडे जाणिवेच्या पातळीवर बघणे होय. मग विचारांची गर्दी हळूहळू कमी होऊ लागते. आपण कोणत्याही ध्यान पद्धतीचा अंगीकार केला तरी परिणाम एकच असतो.
ध्यानामुळे रुग्णाच्या वेदनेचे हरण होते. रुग्णाचे लक्ष वेदने वरून काढून मनाच्या साक्षी भावाकडे नेता येते. मरणप्राय वेदना होतात, अशा रुग्णांच्या बाबतीत ध्यान हे उत्तम कार्य करते. रुग्ण वेदनेकडे साक्षीभावाने पाहू शकतो. कधी-कधी एक आनंदाची झलक जरी मिळाली तरी जीवन प्रवास सुखकर होतो. मन शरीरापासून वेगळे काढता येते, म्हणून शरीर वेदना मुक्त होते. यामुळे माणसास रोगमुक्त होण्यास मदत होते. मनाचा त्याग करण्याची सवय होते. योग्य उपचार पद्धतीमुळे एखाद्याचे विचार बदलणे हाच सर्व रोग मुक्तीचा पाया आहे. आत्म्याचे काही काळापुरतेच  शारीरिक जीवन मर्यादित असते. हा आपला जीवन प्रवास तात्पुरता आहे.

आपण आपल्या शारीरिक अस्तित्वाला चिकटून बसतो आणि दुःख ओढवून घेतो. ध्यान हे स्वतःविषयी ज्ञान मिळवण्यासाठी केले जाते. यातूनच आपल्याला जगण्याची चांगली वाईट सवय ज्ञात होत असते. या जाणिवेतूनच आपल्याला चांगल्या सवयी लागत असतात. त्याचा आपोआपच शरीरावर इष्ट परिणाम होत असतो. जीवनशैली बदलता येते. शरीर, मन, भावनाविचार यांचा संवाद राखला जातो. समाधान हे फुलत जाते याचा उपयोग( बाय प्रॉडक्ट) रोग मुक्तीसाठी होत असतो. मनाचे व्यवच्छेदक जे गुण आहेत काळजी करणे, विवंचना करणे, ताण करून घेणे (यासाठी trace हा शब्द खूप प्रचलित झाला आहे). यातूनच ब्लडप्रेशर, मधुमेह, दमा, डिसेंट्री असे रोग उद्भवतात. असे फंक्शनल disorder च्या व्याधी उद्भवतात यावर ध्यान हा चांगला मार्ग आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य असणे महत्त्वाचे आहे. वेळ न मिळणे ही सबब आहे. उलटपक्षी ध्यानाच्या अभ्यासाने कार्यशक्तीत वाढ होऊन वेळ उरतो, हे सत्य आहे.
ध्यानात चिंतनाला घेतलेल्या विषयाची पुनरावृत्ती करणे याला महत्व आहे. “पी हळद नि हो गोरी “असा प्रकार नाही. काही काळ अडचणी येतील, पण एकदा का सवय लागली की ध्यान सुटत नाही. त्याचे योग्य परिणाम दिसावयास लागतात.
पुढे ध्यान हे नैसर्गिकरित्या जागृत व्हायला लागते. तिथेच मन शांतीचा व आनंदाचा अनुभव येतो. शरीरामध्ये प्राणशक्‍तीचा साठा होतो. योग हा अध्यात्म साधनेचा मार्ग एवढेच त्याचे महत्त्व राहिले नाही. अनेक अंगांनी त्याचे संशोधन झाले आहे. ध्यान म्हणजे अंतकरणात चिंतनाचे बीज रुजविणे व ते वाढविणे त्यातूनच मनाला नाहीसे करणे. ध्यानात ज्ञानेंद्रिय व डोळे मिटलेले असतात. तरीदेखील डोळसपणे जाणिवेच्या पातळीवर बघावे लागते. ” उगे राहावे जे जे होईल ते ते पाहावे”  हेच संत वचनांचे रहस्य दडलेले आहे. ही व्यावहारिक भाषा नाही. लोकांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला. ध्यानासाठी अनुष्ठान हा एक शब्द वापरला जातो. ध्यान बसूनच करावे लागते. स्थिरसुखमासनम हीच ध्यानाच्या वेळेस आसनाची व्याख्या लागू पडते. त्यांनाच ध्यानाच्या अभ्यासामुळे मनाचे स्तर कमी कमी होत जातात. पर्यायाने आरोग्यप्राप्ती होण्यास मदत होते.

– योगाचार्य अशोक पाटील,
नाशिक.  मोबाईल नंबर  – 9371519747

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.