नाशिक : प्रतिनिधी
अनंत श्री विभूषित रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज, तसेच पिठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने युवा मेळावा झाला. उत्तर महाराष्ट्र उपपीठ, रामशेज किल्ल्याजवळ, पेठ रोड येथे 31 डिसेंबरला या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दिंडोरी तालुक्याचा उपस्थितीबाबत प्रथम क्रमांक आला. त्याबद्दल परमपूज्य दादाश्री यांच्या हस्ते दिंडोरी तालुक्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दिंडोरी तालुका अध्यक्ष अमोल खोडे व दिंडोरी तालुका सचिव राहुल मौले यांनी सांगितले की,
दिंडोरी तालुक्यातील सर्व तालुका समिती, सेवा केंद्र अध्यक्ष, सेवा केंद्र समिती, महिला सेना, युवासेना, संग्रामसेना, भक्त, साधक, शिष्य यांनी मेहनत घेऊन युवा नोंदणी केली आणि या युवा मेळाव्यात उपस्थिती दाखवली. त्याबद्दल या सर्वांचे तालुका समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
—