नाशिक : प्रतिनिधी
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ नाशिक शाखेतर्फे रविवारी (ता. २८) मानवधन विद्यानगरी, पाथर्डी फाटा, नाशिक येथे संमेलन होणार असून संमेलनाच्या प्रचारासाठी परिसंवाद व कविसंमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष सावळीराम तिदमे, मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली आहे.
संमेलनस्थळी शनिवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजता ‘साहित्य संमेलनातील सौंदर्यस्थळे व आनंदस्थळे’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांचा परिसंवाद होणार असून, यात डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, लेखिका माधुरी माटे सहभागी होतील. रविवारी (ता. २१) ‘जाऊ कवितेच्या गावा’ अंतर्गत दुपारी चार वाजता खुले कविसंमेलन कवी राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून संमेलनाच्या स्वागताध्यक्ष प्रतिभा सोनार, कवी प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, अकोला येथील कवी अनंत राऊत, मानवधनचे डॉ. प्रकाश कोल्हे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोनदिवसीय परिसंवाद, कविसंमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
—