नाशिक : प्रतिनिधी
येथील श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्ट व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केबीएच विद्यालय, वडाळा येथे आरोग्यविषयक कार्यक्रम झाला. ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार व श्री स्वामी शिवानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ऑर्गनायझेशनच्या राज्य सह – समन्वयक व ट्रस्टच्या अध्यक्ष डाॅ. शेख यांनी सार्वजनिक आणि आरोग्याविषयी माहिती दिली. तसेच ऑनलाइन परीक्षा कौन बनेगा स्वास्थ्य रक्षक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्राचार्य मस्कर व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी हम बनेंगे स्वास्थ्य रक्षक या घोषणा दिल्या. सहाव्या राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त, विद्यार्थी, तरुणांमध्ये निसर्गोपचाराबद्दल जागरुकता आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
—