`यूडब्लूसीईसी’ मध्ये  विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख उपक्रम

0
नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील `यूडब्लूसीईसी’ मध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख करून देण्याचा उपक्रम आयोजित केला होता. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
                वन्यजीव ही आपल्या ग्रहासाठी देवाने दिलेली अनमोल देणगी आहे. या जमिनीवर निरोगी, पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी प्राणी, वनस्पती आणि सागरी प्रजाती मानवाइतक्याच महत्त्वाच्या आहेत. मोठे आणि छोटे प्राणी हे आपल्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहेत, हे विद्यार्थ्यांना या उपक्रमातून समजावून सांगण्यात आले.
    `जंगल’ ही संकल्पना हाती घेतली                       वन्यजीव हे मुलांसाठी खूप मनोरंजक आणि रोमांचक आहे.  हे लक्षात घेऊन `यूडब्लूसीईसी’ ने ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी `जंगल’ ही संकल्पना हाती घेतली आहे. या संकल्पनेदरम्यान विद्यार्थ्यांना खऱ्या हत्तीचा व्हिडिओ दाखवण्यात आला. त्याद्वारे जिथे विद्यार्थी त्याचा आवाज ऐकू शकतात. तसेच शरीराचे सर्व अवयव पाहू शकतात व तो कोणत्या प्रकारचे अन्न खातो आणि कुठे राहतो. या सर्व गोष्टींमुळे मुलांना हत्तीबद्दल स्पष्ट माहीती मिळाली.
          `यूडब्लूसीईसी’ च्या शिक्षिकांनी वन्यजीवांचे शिक्षण हे मनोरंजक, उत्साही आणि माहितीपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुलांना वन्यजीवांचे महत्त्व आणि आपला ग्रह निरोगी ठेवण्यासाठी त्यांची भूमिका समजली. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना प्राण्याविषयी कृतज्ञता, त्यांचे संवर्धन, संरक्षण याचे महत्व सांगण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.