नाशिक : प्रतिनिधी
अशोका एकात्मिक बी.एड. महाविद्यालयात प्रथम वर्ष बीए – बी.एड आणि बीएस्सी – बी.एड विद्यार्थ्यांसाठी उदबोधन वर्ग आणि स्वागत समारंभ झाला. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गाणे गाऊन आणि नृत्य सादर करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
प्रभारी प्राचार्य डॉ. आशा ठोके यांनी, शिक्षक हा एक समाज परिवर्तनाचा महत्वाचा घटक आहे. तसेच शिक्षक हे एक व्रत आहे असे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच अशोका शिक्षण संस्थेचे व्हिजन, मिशन आणि ऑब्जेक्टीव याबद्दल माहिती दिली. अशोका शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. शिक्षकी पेशासाठी आवश्यक वर्तन आणि कौशल्ये यांची माहिती दिली.
नियमावलीविषयी मार्गदर्शन
समन्वयक प्रा. स्मिता बोराडे यांनी अभ्यासपूरक व अभ्यासेत्तर उपक्रम आणि महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य, समन्वयक आणि शिक्षकांबद्दल माहिती दिली. समन्वयक डॉ. रेखा पाटील यांनी महाविद्यालयासंदर्भात असणाऱ्या शिस्तीची नियमावली सांगून विद्यार्थी उपस्थितीची नियमावली देखील सांगण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयात असणाऱ्या इतर सर्व समित्या व त्यांची नियमावली याबद्दल माहिती महाविद्यालयातील शिक्षकांनी दिली.
रॅम्प वॉकचे आयोजन
स्वागत समारंभही झाला. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ झाले. विद्यार्थ्यांसाठी रॅम्प वॉकचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रतिभा आणि कौशल्ये सादरीकरणाची संधी दिली. प्रथम वर्षाच्या सहभागी विद्यार्थ्यांमधून मास्टर फ्रेशर म्हणून राजेश्वर जाधव आणि मिस फ्रेशर म्हणून बतुल पटेल यांची निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून प्रा. कोमल कदम यांनी काम पहिले. अशोका शिक्षण संस्थेचे चेअरमन अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला यांनी मुलांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी प्रयत्नशील
अर्चना पंत आणि मादिहा शेख, फातेमा रामपूरवाला यांनी सूत्रसंचालन केले. विद्याथी विनोना चार्लेस, गायत्री भालेराव व अश्विनी माली यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्राची चव्हाण आणि प्रा. प्रियांका मोरवाल यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक डॉ. रेखा पाटील व प्रा. स्मिता बोराडे व अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक प्रा. प्रिया कापडणे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
—