नाशिक : प्रतिनिधी
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत सोपान योग महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या एम. ए. योगशास्त्र व योग पदविका यांचे निकाल नुकतेच घोषित करण्यात आले असून, त्यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
मुक्त विद्यापीठाच्या योगशास्त्राच्या पदविका परीक्षेसाठी २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला असून, सारिका सुमित मांडलेचा यांनी ९२.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर क्रांती महेंद्र गायकवाड (८१.३३ टक्के) व ज्योती विजय गायकवाड (७८.१७ टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर एम. ए. योगशास्त्र प्रथम वर्षात डॉ. पल्लवी विशाल जाधव, रुतिका मनोज मंडोरे व वैशाली आधार खैरनार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. राज सिन्नरकर, प्रा. तुषार विसपुते, प्रा. चैतन्य कुलकर्णी, प्रा. प्रीती चांदुरकर, प्रा. राधिका अंभोरे, प्रा. गीता गायकवाड, प्रा. राजेंद्र काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव, मार्गदर्शक डॉ. विशाल जाधव, प्राचार्य यू. के. अहिरे यांनी अभिनंदन केले आहे.
—