नाशिकमधील स्त्री मंडळ यांचा ८७ वा वर्धापन दिन उत्साहात 

0
नाशिक : प्रतिनिधी
एरवी शास्त्रीय संगीतावर आधारित शास्त्रीय नृत्य असे सादरीकरण होते. मात्र, येथील एका कार्यक्रमात, सुमधूर चित्रपट संगीतावर आधारित भरतनाट्यम व कथक हे शास्त्रीय नृत्य करण्यात आले. या मिलापाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित नोंदविली होती. निमित्त होते, येथील स्त्री मंडळ यांच्या ८७ व्या वर्धापन दिनानिमित्त नृत्याविष्कार या कार्यक्रमाचे.
स्वरांजली संगीत संकुलनिर्मित हा कार्यक्रम होता. याचे संयोजन सुवर्णा क्षीरसागर यांनी केले होते. भरतनाट्यम नृत्य सादरीकरण हे नृत्याली अकॅडमीच्या नृत्यांगणा सोनाली करंदीकर व त्यांच्या शिष्या खुशी रोजेकर, ऐश्वर्या अफझलपूरकर, तनिषा पोरजे, पूर्वा भानोसे, रिया खालकर, पलक राठी व समृद्धी जाधव यांनी केले. तसेच कथक नृत्य सादरीकरण हे डॉ. सुमुखी अथणी यांच्या शिष्या गौरी अवधूत व समीक्षा कापडणे यांनी केले. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लतादीदींनी गायलेल्या अजरामर चित्रपट गीतांवर भरतनाट्यम नृत्य करण्यात आले. त्याला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाटासह प्रतिसाद मिळाला. सुनेत्रा मांडवगणे यांनी सूत्रसंचालन केले. स्त्री मंडळ हॉल, तिडके कॉलनी, पाण्याच्या टाकीशेजारी, त्रंबक रोड येथे हा कार्यक्रम झाला.

नाविन्यपूर्ण प्रयोग करतो       

                                  चित्रपट गीतांवर भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण प्रेक्षकांना खूपच भावले. प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्यावर आम्ही नृत्य केल्यानंतर सर्वच भारावले होते. नृत्याली भरतनाट्यम अकॅडेमीतर्फे नृत्यातील असेच विविध नाविन्यपूर्ण प्रयोग नेहमीच करत असतो.
– सोनाली करंदीकर – प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगणा, नाशिक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.