नाशिक : प्रतिनिधी
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे शिवजयंती व शिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे, शिक्षणाधिकारी संजय पाटील, शिक्षणाधिकारी अशोक पिंगळे व शालेय समितीचा सदस्य रमेश बाबा काकड, पंढरीनाथ पिंगळे, सुनील धात्रक, कातड, नितीन पिंगळे, मधुकर पिंगळे, भूषण शिंदे, कल्पना पिंगळे, शिवाजी पिंगळे , प्रकाश काकड, शुभम पिंगळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गौरवपूर्ण भाषणे केली. तसेच नृत्याद्वारे शिवाजी महाराजांप्रती असलेला अभिमान दाखविण्याचा प्रयत्न केला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. याप्रसंगी प्राचार्य सोनाली गायकर यांनीही विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.
—