पंचवटीतील शालिनीताई कदम यांनी मरणोत्तर केले देहदान

0

नाशिक : (प्रकाश उखाडे यांजकडून)

आईच्या पोटी आपण जन्म घेतो..जन्मानंतर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. आपण जसजसे मोठे होतो…तसतसे आपण आपल्या शरीराला जपत असतो..कोणत्याही कारणाने आजारी झालो किंवा लहान मोठ्या अपघातात जखमी झालो..हाडे मोडली की आपण तात्काळ रूग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून आवश्यक उपचार करून घेतो…अशावेळी काळजी घेतो…विशेष म्हणजे काही गंभीर अपघातात रूग्णांना काही आवश्यक अवयव यांची आवश्यक असते…यासाठी पैसे देऊन सुद्धा अवयव मिळणे कठीण असते…म्हणून काहीजणं कृत्रिम म्हणजे हातपाय हे कृत्रिम अवयव मोफत किंवा विकतचे घेऊन तात्पुरते वापरू शकतात…परंतू नुकतेच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे काही आवश्यक अवयव मिळणे सुध्दा कठीण आहे…म्हणून आपले चांगले अवयव हे आपल्या मरणोत्तर सुध्दा आवश्यक रूग्णांना गरजेचे आहे. उपयोगी ठरेल…किंवा वैद्यकीय शिक्षण घेण्याऱ्या भावी डॉक्टरांना शिक्षणासाठी आपला मरणोत्तर देह उपयोगात येईल. याचा विचार करून निफाड तालुक्यातील चोटोरी येथील आणि सध्या पंचवटीतील हनुमानवाडी मोरे मळा येथील प्रोफेसर कॉलनीत रहीवासी तथा नाशिक येथील ‘मविप्र’ शैक्षणिक संस्थेचे प्रा. व्ही. बी.कदम यांच्या पत्नी शालिनीताई कदम (वय ६८) यांनी मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
दरम्यान, शालिनीताई विठ्ठलराव कदम यांच्यावर अल्पशा आजारपणामुळे नाशिकच्या एका रूग्णालयात उपचार सुरू असताना नुकतीच सकाळी कदमताई यांना देवाज्ञा झाली. यावेळी अवयवदान चळवळीचे समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांच्याकडे कदम परिवारने शालिनीताई कदम यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर देहदान करण्याचे व्यक्त केले. तेव्हा अवयवदान चळवळीचे समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांच्या मार्गदर्शनाखाली शालिनीताई कदम यांचे देहदान करण्याची संपूर्ण प्रकिया पूर्ण करून आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय टीमकडे शालिनीताई कदम यांचा मरणोत्तर देहदान करण्यात आला. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईक यांच्याकडून देहदान निर्णयाबद्दल स्तुत्य असल्याचे व्यक्त करीत शालिनीताई कदम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
मरणोत्तर देहदान करणाऱ्या शालिनीताई कदम यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे, जावई असा परिवार आहे. मविप्र संस्थेचे प्रा. नितीन कदम व सामाजिक कार्यकर्ते अमोल कदम तसेच डॉ. सारिका संजय रकीबे यांच्या मातोश्री आणि अवयवदान चळवळीचे समुपदेशक डॉ. संजय रकीबे यांच्या त्या सासूबाई होत.

अवयवदान चळवळीचे समुपदेशक डॉ. संजय रकिबे यांच्या मार्गदर्शनाखाली शालिनीताई विठ्ठलराव कदम यांचे देहदान करण्याचा कदम परिवाराने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. समाजाने हा आदर्श स्वीकारायला हवा. देहदानामुळे मृत्यूनंतरही आपण समाजाच्या उपयोगात येतो. समाजात देहदानाविषयी जागृती होणे खूप आवश्यक असल्याचे मत अवयवदान चळवळीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब मोरे व मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी शालिनीताई कदम यांना श्रध्दांजलीपर बोलताना व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.