नाशिक, (वा.)
सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी `बीबीसी यंग रिपोर्टर इंडिया’तर्फे कार्यशाळा आयोजित केली होती.
चुकीच्या किंवा खोट्या बातम्या, माहिती आणि अफवा या आंतरजालावर कशा पसरल्या जातात, याची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आंतरजालावर आलेली प्रत्येक बातमी ही खोटी ? की खरी ? हे शोधण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. व्हिडिओ कसे तयार करतात व अफवा पसरवतात, मूळ गोष्टीपासून आपण कसे दूर जातो. या सर्व गोष्टी केवळ लोकांमध्ये भीती पसरवण्यासाठी तयार केल्या जातात. त्यामागे काही हेतू देखील असतात, जसे लोकांची खिल्ली उडवणे, राजकीय हेतू इत्यादी, ही माहितीही दिली.
विद्यार्थ्यांनी आंतरजालावर प्रत्येक बातमी व माहितीवर विश्वास न ठेवता त्यातील सत्यता पडताळून पाहावी व आपल्या समाजाचे रक्षण करावे, असा या कार्यशाळेचा उद्देश होता. या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या बीबीसीच्या प्रतिनिधींचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी आभार मानले.
—
—