नाशिक : प्रतिनिधी
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सातपूर येथे संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर गणपतदादा मोरे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य प्रमोद कांगुणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
इयत्ता दहावी अ ची विद्यार्थिनी कोमल राऊत हिने गणपतदादा मोरे यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. ज्येष्ठ शिक्षक विनीत पवार यांनी कर्मवीर गणपतदादा मोरे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून विकास कामात केलेले मोलाचे योगदान, त्याचबरोबर पदारमोड करून उदोजी मराठा बोर्डिंगची केलेली जपणूक, बहुजनांच्या शिक्षण व सामाजिक विकासासाठी दिलेले योगदान विविध घटनांद्वारे विद्यार्थ्यांपुढे मांडले. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्र संस्थेचे सेवक संचालक चंद्रजीत शिंदे, उपप्राचार्या रंजना घंगाळे, पर्यवेक्षक विष्णू राजोळे, अनिता पाटील उपस्थित होते. आरती साळवे हिने सूत्रसंचालन केले. कावेरी इंगळे हिने आभार मानले.
—