नाशिक : प्रतिनिधी
मालेगाव येथील साई संजीवनी निसर्गोपचार केंद्र व सोहम योगा अकॅडमी यांचा संयुक्त विद्यमानाने साई संजीवनी योगा चषक जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा नुकतीच झाली. तालुका क्रीडा संकुल, मालेगाव येथे ही स्पर्धा झाली. यात 135 स्पर्धकानी सहभाग नोंदविला. तसेच 100 पेक्षा अधिक पालक उपस्थित होते.
आयुष मंत्रालय, एन. आय. एन. (पुणे),
इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन यांच्यातर्फे रोग रोगमुक्त अभियानातंर्गत हा उपक्रम झाला. डॉ. अनंत बिरादर, डॉ. सुशांत पिसे, डॉ. कुमुद जोशी, महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली.
बक्षिस वितरणप्रसंगी आयएनओचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष महामंडलेश्वर शिवानंद महाराज हे ऑनलाइन उपस्थित होते. कै. ल. रा. काबरा प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संजय शिंदे, डॉ. भूषण पगार, विशाल, डॉ. धीरेंद्र चव्हाण, डॉ. संध्या सोमय्या, दीपाली लामधाडे, यू. के. अहिरे, अशोक पाटील, विनोद भट्ट, जयंत सोमय्या आदी उपस्थित होते.
—