साहित्य संमेलनासाठी पालकमंत्र्यांच्या सूचना

0

नाशिक : प्रतिनिधी

साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे केवळ साहित्य संमेलन नाही तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व आयोजकांनी नियोजन करावे, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
ते भुजबळ नॉलेज सिटी येथे ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, मुख्याधिकारी लीना बनसोड, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, नोडल अधिकारी नितीन मुंडावरे, विश्वास ठाकूर, शंकर बोऱ्हाडे, रवींद्र पगार, दिलीप खैरे, डॉ. शेफाली भुजबळ आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.