तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन अर्थात हॅप्पी थॉटस ही एक सेवाभावी संस्था आहे. समाजातील विविध वयोगटातील व्यक्तींसाठी जीवनाच्या प्रमुख स्तरावर मार्गदर्शनाचे कार्य करीत आहे. तिच्या ज्ञान प्रवासात ISO 9001: 2008 या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित केले आहे. ‘न नफा, न तोटा’ या सिद्धांतावर आधारित मुंबई ट्रस्ट ॲक्टच्या अंतर्गत १९९९ पासून ही संस्था कार्यरत आहे. सरश्रीच्या साधनेच्या अनुभवावर शिकवणीवर असलेला उद्देश म्हणजेच “उच्च विकसित समाजाची निर्मिती व आनंदी सकारात्मक विचारांद्वारे (HAPPY THOUGTHS) सृजनतेचे सिंचन करणे’ हा आहे. उच्चतम विकसित समाज निर्माण करण्याचं फाऊंडेशनचे उद्दीष्ट भारतीयांच्या युवा हृदयाला साद घालत आहे. टिजीएफच्या या वैश्विक कार्यात समाजातील सर्वच घटकांनी सामील व्हावं, हे तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशनचे लक्ष आहे.
समस्त मानवाला ‘जीवनात जीवन जगताना’ आनंद हवा असतो, प्रेम, शांति देखील हवी असते. यासाठी सकारात्मक विचारांची जोड हवी. ही जोड़ कशी प्राप्त करावी? सकारात्मक विचार कसे करावेत? ते जीवनात कसे उतरावेत? यांचेच प्रशिक्षण या संस्थेतून विविध उपक्रमाद्वारे शिबिराच्या संक्रमणातून संस्थेचे संस्थापक सरश्री यांच्या द्वारा प्रकाशित होणाऱ्या विविध पुस्तकांद्वारे केले जाते.
फाऊंडेशनची ज्ञान देण्याची पद्धत खालीलप्रमाणे –
जगातील प्रत्येक व्यक्तीला तेजज्ञान मिळावं.
ते मिळवण्यासाठी फाऊंडेशनने सर्व प्रकारची व्यवस्था केलेली आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती तेजसंसारी बनून, तिला भय, चिंता आणि तणावमुक्त जीवन जगता यावं. क्रोधापासून विविध मान्यतांतून, अंधश्रद्धांपासून मुक्त होऊन तिने आपल्याबरोबर इतरांचंही जीवन आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न करावा. विधायक, सकारात्मक आणि आनंदपूर्ण विचारांचा (हॅपी थॉट्सचा) प्रसार जगभर व्हावा. प्रत्येक माणसाने त्याप्रमाणे विचार करून कृती करावी आणि इतरांनाही तो विचार द्यावा असा उद्देश तेजज्ञान फाउंडेशनचा आहे.
थोडक्यात, Think Happy Thoughts.
Say Happy Thoughts.
Spread Happy
Thoughts यासाठी ही संस्था काम करते.
हॅप्पी थॉट्स चे अभिवादन:
हॅपी थॉट्स म्हणजे आनंदपूर्ण विधायक विचार, हॅपी थॉट्स म्हणजे शुभेच्छा, जी सर्व इच्छा व विचार यांच्याप्रति असणारी आसक्ती संपुष्टात आणते. यामुळे दुःखमुक्तीचा मार्ग, मुक्तिपथ मिळतो. इच्छा, आकांक्षा आणि काही विचार माणसाला स्वतःमध्ये अडकवून ठेवतात किंवा माणूस त्यामध्ये स्वतःला अडकवून घेऊ इच्छितो. अशा बंधनातून मुक्त होण्याची इच्छा म्हणजे शुभ विचार, ‘हॅपी थॉट्स’. हॅपी थॉट्स हा तेजज्ञान फाउंडेशनचा मूलमंत्र आहे. त्यावरच टी.जी.एफ.ची इमारत उभी आहे. म्हणूनच टी.जी.एफ.चे सदस्य जेव्हा कोणालाही भेटतात, तेव्हा ते एकमेकांना ‘हॅपी थॉट्स’ म्हणत अभिवादन करतात. म्हणजेच प्रत्येकासाठी आनंददायी विधायक विचारांची मंगल कामना करतात. ‘एक गरीब माणूस प्रसन्न आणि आनंदित होऊ शकतो, परंतु एक आनंदी माणूस कधीच गरीब होत नाही.’
(पूर्वार्ध)
— खोजी पुरूषोत्तम सावंत, नाशिक
मो. नं. – 9561031792
मेल आयडी – purushottam16want@gma