सकारात्मकतेने विचार केला असता असे लक्षात येते की भारतातील वैदिक धर्माचा पाया जोडण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे. भारतीय राज्यकर्त्यांनी इतर परकीय राज्यकर्त्याप्रमाणे इतरत्र जाऊन आक्रमणे केली नाहीत. या उलट त्यांनी सर्वधर्म स्वीकारभाव ठेउन आपली सहिष्णुता वृती जोपासली. हाच तो महत्वाचा धागा वैदिक धर्माने विश्वाला आज वरदान ठरतो आहे. आणि म्हणूनच सर्व जग आज भारताकडे आशेने बघत आहे.
वैदिक धर्मात असे काय आहे? ज्याच्या सहाय्याने त्यांनी समाजाला एका धाग्यात बांधून ठेवले आहे. एखाद्या धाग्याप्रमाणे, फुलांच्या हाराप्रमाणे सर्व फुले एकाच धाग्यात बांधून ठेवली आहेत आणि तो एक अखंड हार बनतो. वैदिक धर्माने, अर्थ आणि कामाचा केलेला विचार हा या धर्माच्या धाग्याचा अर्थ आहे व कामाची सुंदर स्वतंत्र मांडणी केली आहे. वैदिक धर्मात अर्थ आणि काम दोघांची सुंदर व्यवस्था आहे. ती व्यवस्था म्हणजे वर्णाश्रम व्यवस्था. यामध्ये जीवनाच्या चार अवस्थांमध्ये बदल दाखविण्यात आले आहे. खरंच ही संस्कृती वंदनीय आणि धन्यही आहे. म्हणूनच आता जगाला अशा धाग्याची गरज आहे. जो संपूर्ण जगाच्या शांतीची इच्छा पूर्ण करू शकतो. हे काम तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरश्री यांच्या पुणे स्थित मनन आश्रम येथे सुरू आहे. तेथे मानव मंदिराची आणि या धाग्याची कार्यप्रणाली संपूर्ण विश्वासाठी कार्यरत आहे. आम्हाला फक्त यात सहभागी होणे येवढेच शिल्लक आहे. (उत्तरार्ध) – खोजी पुरूषोत्तम सावंत, नाशिक
मो. नं. – 9561031792 मेल आयडी – purushottam16want@gmail.com
आता सर्वांना जोडणारा धागा हवा !
Get real time updates directly on you device, subscribe now.