नाशिक : प्रतिनिधी
येथील प्रा. प्र. द. कुलकर्णी लिखित व राजहंस प्रकाशन प्रकाशित ‘आतून उगवलेल्या कविता’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि.5) सकाळी 10 वाजता गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात होणार आहे.
लेखिका, संपादक व समीक्षक डॉ. वंदना बोकील – कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून कवी व लेखक विवेक उगलमुगले आणि साहित्यिक, वक्त्या व एकपात्री कलाकार डॉ. प्रतिभा जाधव उपस्थित असतील. डॉ. आशा प्र. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
—