नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. प्रा. शितल आहेर व प्रा. मंजुषा भोर यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रभारी प्राचार्य डॉ. आशा ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी. एम. गुजराथी, संस्थेचे सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास प्रा. स्मिता बोराडे, प्रा. रेखा पाटील, प्रा. यज्ञा देवकुते, प्रा. प्रियंका मोरवाल, प्रा. कविता पालवे, प्रा. श्वेता वराडे, प्रा. योगिता उफाडे, प्रा. सुपान चोपडा, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
—