पित्ताशयातील खडे
पित्ताशयातील खडे त्यांच्यापासून होणाऱ्या वेदना या भयंकर असतात. पित्ताशय यकृताच्या उजव्या भागात खालच्या बाजूस असते. याच ठिकाणी स्वभाविक खडे बनतात. पित्ताशयाला इंग्रजीत Gall Bladder आणि खड्यांना Gall Bladder Stone असे म्हणतात.
लक्षणे
उजव्या बरगड्यांच्या खाली बेंबीपर्यंत सुरुवातीला थोड्या थोड्या वेदना होतात, भूक न लागणे, भोजनाबद्दल अरुची, कधीकधी कावीळ होणे, कधी कधी ताप येणे, खडे पित्ताशयाच्या नलिकेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा असह्य वेदना होतात, अचानक थंडी येणे, कापरे भरणे, घाम येणे.
कारण
अनैसर्गिक आहार – विहार, आहारामध्ये चमचमीत व अती तेलकट तुपकट पदार्थ, गोळ्या औषधांचे अधिक सेवन, तसेच कष्टाची कमी अशा अनेक कारणांनी शरीर रोगी बनते. सर्वप्रथम यकृत हे रोगी बनते. कारण अन्न पचनाचे महत्त्वाचे कार्य करण्यात यकृताचा मोठा सहभाग असतो. परिणामतः यकृतात तयार होणारे पित्त विकारयुक्त होते. दूषित पित्ताचे रूपांतर हे खड्यामध्ये होते.
योगोपचार–
1. आसन- शवासन, योगनिद्रा, ताडासन, पर्वतासन, उष्ट्रासन, सुप्तवज्रासन, मत्स्यासन.
2. प्राणायाम- नाडीशोधन.
3. क्रिया- दण्ड, वस्र, वमन, शंख प्रक्षालन
4. प्रणव ॐ कार साधना
5. ध्यान
निसर्गोपचार- प्राकृतिक चिकित्सेनुसार रुग्णाला वेदना कालावधीत गरम पाणी उपचार देणे अधिक लाभदायी आहे.
1. डोक्यावर थंड पाणी पट्टी गरम पाण्यात अर्धा तास ठेवावे.
2. नंतर मोठा टॉवेल गरम पाण्यात बुडवून पित्ताशयाच्या ठिकाणी ठेवावा यामुळे वेदना कमी होऊन नलिका प्रसरण पावतात व खडे बाहेर पडण्यास मदत होते.
3. एनिमा देणे.
4. उपवास महत्त्वाचा आहे.
5. लिंबू पाणी दररोज दूध दही लाभदायी आहे.
6. कटिस्नान उपयुक्त
7. ताजी फळे, अंकुरीत मूग, फलाहार, टरबूज, आहारात असावी.
वर्ज- दूध, केळी, बटाटा, मूळा, गाजर, साखर, मैदा, नशिले पदार्थ, तंबाखू, अल्कोहोल इत्यादी.
– प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख,
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल:rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर:९८२२४५०७६८
—