सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : उच्च रक्तदाब

0

आजार – उच्च रक्तदाब

मनुष्याला जीवंत ठेवण्यासाठी रक्त हे शरीराच्या प्रत्येक भागांमध्ये रक्तवाहिन्यांच्याद्वारे पोहचते व संपूर्ण शरीराचे पोषण करते. हे अति आवश्यक कार्य आपल्या हृदयामार्फत चालत असते. हृदयातून पंपाप्रमाणे रक्त धमनी व रक्तवाहिन्यांमध्ये पुढे सरकविणे यालाच रक्तदाब असे म्हणतात. इंग्रजीमध्ये Blood Pressure म्हणतात. ‘रक्तदाब’ हा अस्तित्वाने कोणत्याही प्रकारचा रोग नसून ती तो इतर वेगवेगळ्या रोगाचे लक्षण म्हणून प्रकट होत असतो.

लक्षणे

श्वास फुलणे, अस्वस्थ वाटणे, छातीवर दाब येणे, झोप न येणे, हृदयाचे ठोके वाढणे, चेहरा, कान, नाक लाल होणे, रक्तवाहिन्या स्पष्ट दिसणे व घाम येणे, डोके दुखणे, चक्कर येणे.

कारण

क्रोध, चिंता, भीती, भावनांचा असमतोल, दुःख, नैराश्य, वैफल्य, मानसिक ताण-तणाव, अतिआहार, अपचन, गॅसेस इत्यादी.

योगोपचार

             आसन- शवासन 20 मिनिटे योगनिद्रा, ताडासन, पादहस्तासन, पवनमुक्तासन,

प्राणायाम- अनुलोम विलोम (नाडीशोधन) भस्त्रिका कुंभक रहित करणे, दिर्घ श्वसन पूरक-रेचक.

ध्यान– 30 मिनिटे सुखासनात बसून करावे.

भक्तियोग– प्रणव ॐकार साधना, आध्यात्मिक वाचन, भजन, कीर्तन, प्रवचन इ.

निसर्गोपचार-

आहार- दूध घेणे. फळे, हिरव्या भाज्या, दही, लसून उच्च रक्तदाबात उपयुक्त आहे. आवळा, बेहडा, काळे, मनुके इत्यादी आहारात सेवन करावे.

स्नान- सकाळी मेहन स्नान,  संध्याकाळी रिठ (पाठीचा मणका थंड) स्नान. गरम पाद स्नान, रात्रभर कंबर लपेट पट्टी, दररोज गरम पाण्याचे स्नान, पिण्यासाठी गरम पाणी, संपूर्ण शरीराची मृदु मालिश.

वर्ज- मिठाचे अतिसेवन, जेवणानंतर लगेचच वामकुक्षी नको, थंड पाण्याने आंघोळ करू नाही, मादक द्रव्यांचे सेवन, लघवी व शौचास, वेग रोखू नाही. अतिआहार करू नये.

– प्रा. डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर : ९८२२४५०७६

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.