मधुमेह
ज्या व्यक्तींचे जीवन अति सुखकारक आहे की ज्यांच्या जीवनात व्यायामास कोणतेच स्थान नाही त्यामुळे हे लोक स्थुलतेकडे वाटचाल करतात व मधुमेह हा रोग जडतो. किडनीच्या कार्यात बिघाड होणे व किडनी प्रभावित होणे यातून रक्तातील साखरेचे प्रमाण अति होणे किंवा अति कमी होणे यास मधुमेह असे म्हणतात. मधुमेह हा आयुष्यभर आपल्या सोबत चालणारा रोग आहे.
लक्षणे
लघवीत साखर येणे.
लघवी चिकट होणे किंवा घट्ट होणे.
वारंवार लघवी येणे.
अधिक भूक लागणे, त्वचा सुकणे, शरीर कंप पावणे, थरकाप होणे, भीती वाटणे, आळस, कंटाळा, थकवा येणे, दृष्टी कमी होणे, झोप कमी येणे, पोट साफ न होणे, चिडचिड होणे, मानसिक अस्वस्थता निर्माण होणे, मधुमेहाच्या कल्पनेने दुःखी कष्टी होणे इत्यादी
कारण
अधिक गोड, आंबट पदार्थ खाणे त्यामुळे पाचक ग्रंथी दुर्बल बनतात. परिणाम स्वरूप इन्शुलिनची मात्रा परिणामात्मक व गुणात्मक दृष्ट्या कमी होते. त्यामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते व अतिरिक्त साखर लघवीद्वारे त्याग केली जाते. शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण तणाव, चिंता, दुःख, राग, द्वेष, मत्सर, भावनांचा असमतोल, नकारात्मक विचारसरणी, चिडचिड, अहंपणा, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही अतिवापर यातून हा रोग जन्मास येतो.
योगोपचार
दैनंदिन योगसाधनेने ५ ते ६ आठवड्यात मधुमेह नियंत्रणात येतो
1. सुर्यनमस्कार
2. आसन- ताडासन, पादहस्तासन, पवनमुक्तासन,कटीचक्रासन, उत्कटासन, त्रिकोणासन, अर्धहलासन, विपरीत करणी, सर्वांगासन, नौकासन, भुजंगासन, धनुरासन, शलभासन,वक्रासन,अर्ध मत्स्येन्द्रासन,उष्ट्रासन,मत्सासन, पश्चिमोत्तानासन, वज्रासन, सुप्त वज्रासन इ.
3. षठ्क्रिया- कपालभाती, नेति, वमन,शंख प्रक्षालन
4. प्राणायाम- सुर्यभेदन, भस्त्रिका, अग्निसार
5. ध्यान व प्रणव ॐ कार साधना
निसर्गोपचार–
आहार- पालेभाज्या, फळे, व आहार ताजा व सात्विक स्वरूपाचा असावा. आहारात लिंबू घ्यावे. एनीमा घ्यावा.
स्नान- पोटावर मातीपट्टी, थंड कटीस्नान,थंड व गरम कटीस्नान, सकाळ संध्याकाळ दोन किलोमीटर फिरणे (पायी चालणे)
वर्ज- अति गोड, अति आंबट पदार्थ,अति तिखट, अति तेलकट पदार्थ खाऊ नये. धुम्रपान करू नये, चहा, कॉफी, मांसाहार करू नये.
– प्रा.डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल:rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर:९८२२४५०७६८
—