संधिवात
वय परत्वे सांध्याची झीज झाल्यामुळे विशेषतः जास्त वजन सहन करणारे शरीरातील कंबर, गुडघे व घोट्याचे सांधे सुजतात, दुखू लागतात. क्वचित एखादा गुडघ्याचा सांधा दुखू लागतो आणि संधीवातास सुरुवात होते. संधिवात,आमवात,अस्थिसंधीगत वात असे किरकोळ लक्षणे असे या आजाराचे प्रकार पडतात. संधिवात हा प्रौढावस्थेतील एक आजार आहे. उपचाराच्या दृष्टीकोनातून एक कठीण असा रोग मानला जातो.
लक्षणे
सर्व सांधे क्रमाक्रमाने दुखणे, सांध्यांना सूज येणे, सांध्याची हालचाल मंदावणे, सांधे व शरीर कडक होणे.
कारण
व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम, वाढलेले वजन, अनियंत्रित आहार, पोट साफ न होणे, मानसिक ताण तणाव, नकारात्मक विचारसरणी, अतिप्रमाणात वेदनाशामक व इतर गोळ्या औषधे सेवन, अतिप्रमाणात धूम्रपान करणे इ. या व्यतिरिक्त पित्तप्रकृतीच्या व्यक्तीच्या शरीरात विजातीय पदार्थ जास्त जमा होऊन हे विजातीय पदार्थ हाडे व सांध्या कडे जाऊन आजारांच्या संपर्कात आल्याने सांध्यांमध्ये वेदना सुरू होतात व हा रोग मनुष्यास जडतो.
योगोपचार
1. सूर्यनमस्कार
2. आसन- शशांकासन, मार्जरासन, आकर्ण धनुरासन, वज्रासन (प्रत्येक जेवणानंतर), ताडासन, पादहस्तासन, पवनमुक्तासन,
3. षठ्क्रिया- नेति व कुंजर, वमन
4. प्राणायाम- नाडीशोधन, भस्त्रिका
5. ध्यान व मौन
निसर्गोपचार-
आहार
फलाहार- संत्री, मोसंबी, अननस, दुग्धजन्य पदार्थ घ्यावेत. आहार ताजा व सात्विक स्वरूपाचा असावा. आहारात लिंबू घ्यावे. एनीमा घ्यावा.
स्नान- थंड गरम पट्टी लपेट आठवड्यातून दोन वेळा बाष्प स्नान व मालीश.
वर्ज्य – केळी, द्विदल कडधान्य, उदाहरणार्थ – डाळी, मेथी, भाजी, मांसाहार, चहा-कॉफी, ब्रेड, आमलेट, धूम्रपान इत्यादी.
—
लेखक – प्रा. डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख,
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर : ९८२२४५०७६८
—