आम्लपित्त
किडणी अथवा यकृत आणि आपले कार्य योग्य केल्यास शरीरात प्रमाणित मात्रेत पित्ताची उत्पत्ती होते. ज्यामुळे योग्य वेळी भूक लागते. पचनक्रिया योग्य वेळी होते. त्यामुळे शरीराचे रक्त शुद्ध राहते. ज्यामुळे व्यक्ती पूर्णपणे स्वस्थ व सकारात्मक राहतो. बुद्धी प्रखर होते. डोळ्यांमध्ये चमक असते. चेहरा नेहमी प्रसन्न व आनंदी असतो. परंतु शरीरात पित्ताची मात्रा वाढल्याने मळमळ, जळजळ, उलटी होणे व पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे पित्त बाहेर त्याग केले जाते. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणून यकृतास मानले जाते.
लक्षणे
डोके दुखणे, मळमळणे, तोंडाला घाण पाणी येणे, उलटीचा आवेग येणे, पोटात, छातीत जळजळ होणे, छातीत चमक येणे, आळस, कंटाळा, थकवा येणे, काहीही खाण्याची इच्छा न होणे, भूक न लागणे, पोट साफ न होणे, चेहऱ्यावर मुरूम व पुरळ येणे, त्वचा निस्तेज होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, चेहऱ्यावर तारुण्य किंवा सदअवस्था न दिसता अकाली वार्धक्य वाटणे, जिभेवर जाड पिवळा, पांढरा थर येणे, डोळे निस्तेज होणे, स्वभाव चिडचिडा, रागीट होणे, झोप न येणे.
कारण
यकृतास त्याच्या शक्तीच्या क्षमतेपेक्षा अधिक काम केल्याने बिघाड निर्माण होतो. अति आहार, सारखे सारखे भूक नसताना खाणे, अति तेलकट, अति आंबट, अति गोड जास्त खाणे, अवेळी खाणे, भूक लागल्यानंतर अधिक काळ उपाशी राहणे, पुरेशी झोप न घेणे, अति जागरण करणे, चुकीचे वर्ज अन्न घेणे, व्यायाम न करणे, मादक द्रव्य व धूम्रपान करणे यामुळे पित्ताचे प्रमाण वाढते.
योगोपचार
1. आसन- ताडासन, कटिचक्रासन, पश्चिमोत्तानासन, उष्ट्रासन, भुजंगासन, धनुरासन, शलभासन, वक्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, उत्तान मण्डुकासन इत्यादी.
2. षठ्क्रिया- नेति, वमन,शंख प्रक्षालन
3. बंध- उड्डियान, अग्निसार
4. प्राणायाम- नाडीशोधन, भस्त्रिका, भ्रामरी, दीर्घश्वसन
5. ध्यान व प्रणव ॐ कार साधना
निसर्गोपचार– निसर्गोपचारात आम्लपित्तावर खालील उपचार करणे आवश्यक आहे.
१) उपवास- दोन ते तीन दिवसाचा उपवास त्या बरोबर एनीमा घेऊन पोट साफ करणे. पोटावर थंड पट्टी घ्यावी.
२) गरम व थंड पाण्यात लिंबू पिळून दिवसभरात तीन वेळेस ते प्राशन करणे
३) रसाहार- दोन ते तीन दिवस निव्वळ रसाहार व एक आठवडा फलाहार घेणे.
४) आहार- ताजे अन्न, सलाड्, उकडलेल्या भाज्या, ताक, मध इ.
५) यकृताच्या जागेवर मालिश करणे.
६) बाष्प स्नान व यकृताच्या जागेवर गरम, थंड पाणी पट्टी ठेवणे.
७) सकाळ-संध्याकाळ फिरणे.
८) सूर्य तप्त जल- तुळशीचे पाने टाकून पिणे
वर्ज- अवेळी जेवण, डाळीचे पदार्थ, मेथीची भाजी, आंबट पदार्थ खाऊ नये, धूम्रपान, अल्कोहोल घेऊ नयेत, जास्त जागरण करू नये, जास्त वेळ पोट रिकामे ठेवू नये.
योग विभाग प्रमुख,
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल:rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर:९८२२४५०७६