डोकेदुखी आजार
डोक्याची पुढील बाजू दुखते, अर्धे डोके दुखते, संपूर्ण डोके दुखते. अशा अनेक तक्रारींनी डोकेदुखी आपल्याला त्रास देत असते. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये हा विकार दिसून येतो. या आजाराला अर्धशिशी किंवा मायग्रेन मध्येही वर्ग केले जाते. यात किरकोळ हलके डोके दुखणे, ते तीव्र वेदना असणे.
डोकेदुखी हा स्वयं रोग नाही. परंतु इतर कोणत्याही आजाराचे लक्षण असतो. डोकेदुखी ही आपणास सूचना देत असते की, शरीरात इतर ठिकाणी बिघाड झालेला आहे हा शारीरिक किंवा मानसिकही असू शकतो.
कारण
डोके दुखीचे कारण एक नाही अनेक असतात. परंतु मुळ कारण पाचन आणि मलविसर्जनात अनियमितता, रक्तामध्ये काही मल मिश्रित झाल्यास डोकेदुखी वाढते. कधी कधी मेंदूत ट्युमर असणे, दृष्टी दोष निर्माण होणे इ. बद्धकोष्ठता, अधिक जेवण, अपचन, पोटाची खराबी, उत्तेजक पदार्थ सेवन-चहा, कॉफी, तंबाकू, सिगारेट, अल्कोहोल यांचे अति सेवन, रक्तदाब वाढणे, अनिद्रा इ.
लक्षणे
कानाच्या मागे दुखणे, कपाळ दुखणे, डोक्यांच्या भुवया दुखणे, डोके मध्यभागी दुखणे, संपूर्ण डोके गरम होणे,अर्धे डोके दुखणे इ.
चिकित्सा
योगोपचार – १) सूर्यनमस्कार
२) आसन- ताडासन, अर्धकटी चक्रासन, पाद हस्तासन
३) मुद्रा- ब्रम्हमुद्रा, प्रणव ॐ कार
४) प्राणायाम- उज्जायी, भस्रिका, नाडीशोधन, शुद्धीक्रिया-कपालभाती, जलनेती, सूत्रनेती, वमन, ध्यान इ.
निसर्गोपचार –
आहार हलका व पथ्यकारक सात्विक असावा. दुध, तूप, ताजी फळे, गरम अन्न, हिरव्या पालेभाज्या जेवणात असाव्यात. जेवण वेळेवर घ्यावे व चावून खावे. काहीवेळेस उपवास किंवा लंघन योग्य होय.
उपचार
लिंबू पाणी, एनिमा तसेच वमन,थंड रिठ स्नान,व्हायब्रेटरने पाठीचा मणका व डोक्याची हलकी मालिश, पाय थंड पाण्यात ठेवणे, हिवाळ्यात पाठीचा मणका गरम करणे. जास्त डोकेदुखी असेल तर थंड पाणी व माती पट्टी ठेवणे.
रक्तदाब जास्त असणाऱ्या रुग्णांनी रसदार फळे आहारात ठेवणे योग्य आहे. उदा. आंबा, सफरचंद, द्राक्षे, संत्री व पपई इ. शरीरात आम्लता वाढल्याने डोके दुखत असेल तर एनिमा घेणे, लंघन करणे व ताजे पाणी थोडे-थोडे पिणे आवश्यक आहे. सात्विक जेवण घेणे.
वर्ज
विडी, सिगारेट, तंबाखू, मद्यपान, अति तेलकट अति आंबट पदार्थ वर्ज आहे. चालत्या गाडीत किंवा रेल्वेत वाचन करणे वर्ज आहे.
प्रा.डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख, संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर : ९८२२४५०७६