सर्दी पडसे
मानव कल्याणासाठी भारतीय ऋषीमुनींनी संपूर्ण जगभराला योगशास्राच्या रूपाने अमूल्य अशी देणगी दिली आहे. स्वास्थ्य जीवनासाठी नैसर्गिक, नियमित आहार-विहार, निद्रा, जागरण आवश्यक आहे. या संबंधी गीतेमध्ये सुंदर श्लोक आला आहे.
“ युक्तहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दु:खहा ॥ ” गीता ६-१७
अशाप्रकारे मनुष्य निसर्ग नियमांचे उल्लंघन करतो.तेव्हा निसर्ग दण्ड स्वरूपाने शिक्षा म्हणून आजार हे मनुष्यास होतात. कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक तकलीफ, त्रस्तता म्हणजे आजार होय.
• सर्दी पडसे म्हणजे काय ?
सर्दी पडसे हा श्वसन विकाराच्या संदर्भातील आजार आहे.श्वसन मार्गातून पातळ पाणी, कफ वाहने, नाक बंद होणे, वारंवार शिंका येणे यालाच सर्दी असे म्हणतात.
• कारण
हवेतील बदल, ऋतू बदल, पाणी बदल, जागा बदल, पावसात भिजणे, काहींच्या बाबतीत अलर्जी वेगवेगळ्या प्रकारची असते. उदा. धूळ, आईस्क्रीम, थंड पाणी पिणे, हिरवी-लाल मिरची आहारात येणे ई. कारणांमुळे सर्दी पडसे होते. मुख्य कारण रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे.
• दुष्परिणाम
डोळे लाल होणे, डोके दुखणे, नाक चोंदणे, नाकातून पाणी व श्राव येणे, अंग कणकण येणे, ताप येणे, अस्वस्थ वाटणे ई.
• उपचार -योगोपचार
1) शुद्धीक्रिया -जलनेती, सूत्रनेती, वमन इ.
2 ) प्राणायाम – नाडीशोधन,भस्रिका,उज्जायी.
3) आसन – ताडासन, कटिचक्रासन, सुप्तवज्रासन, भुजंगासन, धनुरासन, वज्रासन, मण्डुकासन, गोमुखासन, अर्धमच्छेंद्रासन, मत्स्यासन
4) प्रणव ओंकार साधना, ध्यान धारणा
सदर विकार होऊ नये म्हणून वरील योगोपचार उपयुक्त आहेत. आजार झाल्यानंतर गुरु उपदेशाप्रमाणे किंवा तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत.
• निसर्गोपचार
आहार हलका असावा. कमी प्रमाणात भोजन घ्यावे, जास्त त्रास असेल तर लंघन करावे. गवती चहा, आले, इलायची इ. काढा घ्यावा. गरम पाणी सेवन करावे, गरम पाण्याची वाफ, निलगिरी, तुलसी इ.पाने टाकून घ्यावी, नैसर्गिक स्वरुपात ‘सी’ जीवनसत्व, लिंबूपाणी, मधपाणी मोठ्या प्रमाणत घ्यावे. छाती व पाठ गरम सुर्यकिरणांनी शेकवून घ्यावी.
• दक्षता
तेलकट, तिखट पदार्थ वर्ज, थंड हवेत फिरू नये, थंड पदार्थ खाऊ नये, गरम कपडे वापरावीत. सर्दी पडस्याला हलके घेऊ नये, कारण पुढे निमोनिया, ब्रोंकायटीस, इंफ्लूएन्झा, अशा रोगांच्या निर्मितीचे मूळ कारण सर्दी पडसे आहे.
यासाठी दैनंदिन जीवनात ‘ करो योग भगावो रोग ।’
(क्रमश : )
– प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर
ईमेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर : ९८२२४५०७६८
—