नाशिक : प्रतिनिधी
गदिमा पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी प्रशांत केंदळे यांचा रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. रोटरी प्रेसिडेंट बेनिवाल यांनी त्यांचा सत्कार केला.
योगाचार्य अशोक पाटील यांनी परिचय करून दिला. स्नेहा पुल्ली यांनी शुभेच्छा दिल्या. कोठावदे यांनी आभार मानले. याप्रसंगी केंदळे यांनी आपल्या निवडक कविता सादर केल्या. कवी तुकाराम ढिकले यांनीही आपली कविता सादर केली.
—