ऋतुरंगच्या शिवआराधनेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नाशिक  : प्रतिनिधी
नाशिक रोड येथील प्रमुख सांस्कृतिक केंद्र असणा-या ऋतुरंग परिवारातर्फे ऋतुरंग भवनमध्ये शिव आराधना हा गायन आणि शास्त्रीय नृत्यावर आधारीत अनोखा कार्यक्रम उत्साहात झाला.
ऋतुरंग परिवाराचे वसंतराव नगरकर, विजय संकलेचा, सुभाष कुलकर्णी, सुरेश गवंडर, प्रकाश पाटील, विवेक बापट, शेखर कावळे, कामिनी तनपुरे, डॉ. शुभांगा रत्नपारखी, शेखर शिरसाठ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक पवित्रा भट यांचे शिष्य गरिमा चव्हाण (नाशिक) आणि ओंकार पाटील (कोल्हापूर) यांनी भरतनाट्यम नृत्य, तर ईशा जोशी आणि संतोष जोशी यांनी गायन सादर केले. निवेदन तन्वी अमित यांचे होते. तबल्यावर संकेत फुलतानकर याने तर सिंथेसायजरवर चिन्मय कुलकर्णीने साथ दिली. हरिद्वार, उज्जैन, माहेश्वर आदी ठिकाणी नृत्य व गायनाच्या माध्यमातून शिव आराधा कार्यक्रम होतात. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये प्रथमच असा कार्यक्रम झाला. ओम नमः शिवाय…. शंभो शंकरा करूणा करा…, भस्म विलेपित रूप साजिरे…,  मागे उभा मंगेश…, हे शिवशंकर हे करूणाकर…, गौरीहरा दीनानाथा…, सोहम् हर डमरू बाजे…, हेचि दान देगा देवा…, या गीतांवरील नृत्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिवस्तुती, तांडवनृत्य, तोड़मंगलम् देवी स्तुती यावरील नृत्याला विशेष दाद मिळाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.