नाशिक, (वा.)
पोलिसमित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. संघपाल उमरे, मुख्य सल्लागार सुभाष सोळंखे व सचिव विनोद पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक टीमची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र महिला अध्यक्ष माधुरी गुजराथी होत्या. व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल परदेशी, राजेंद्र आहेर व पूजा जाधव उपस्थित होते.

गुजराथी यांचा सत्कार कामिनी भानुवंशे यांच्या हस्ते करण्यात आला. गुजराथी यांनी संस्थेसंदर्भात सर्व माहिती, तसेच काम कशा पद्धतीने करू शकतो यासंदर्भात मार्गदर्शन केले. सुनील परदेशी यांनी सामाजिक कार्य करताना आलेले अनुभव सांगितले. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. विविध क्षेत्रांतील व्यक्तींना मार्गदर्शक म्हणून टीममध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजेंद्र आहेर यांनी आभार मानले. याप्रसंगी अशोक वराडे, पंकज वारुळे, पिंटू थोरात, परवेज सैय्यद, लक्ष्मण जगदाळे, राजेश शहा, रेखा गिते, मंजुषा लोहगावकर, विजया जाधव, सिमी राणा, मंगल मोकळ, रोहिणी जाधव, वंदना परदेशी, सोनाली भोजणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
—