नाशिक : प्रतिनिधी
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले जवान व निरपराध नागरिकांना पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नाशिक शहर वाहतूक युनिट क्रमांक 2 चे पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत, वाहतूक पोलीस कर्मचारी रतन सांगळे, सुशिल सोर, राजेंद्र देवरे, विजय बोरसे, धनंजय दोबाडे आदींचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सुनील परदेशी, विरेंद्र टिळे, पंकज वारूळे, शैलेश पगार, लक्ष्मण जगदाळे, सविता सिंह, कामिनी भानुवंशे, वंदना परदेशी, विजया जाधव यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
—