नाशिक : प्रतिनिधी
जगात शांतता नांदावी म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी अनेक देशांना भेटी देऊन शांततेचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे सर्व जगात शांतीदूत म्हणून देखील ते ओळखले जातात, असे प्रतिपादन मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर यांनी केले.
मविप्र समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून उत्साहात साजरा झाला. तेव्हा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून दरेकर बोलत होते.
व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील उपस्थित होते. पं. नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
चैताली गीते यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक शरद शेजवळ यांनी आभार मानले.
—