नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी सेवा समिती, नाशिक संचलित कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, वडाळा या शाळेमध्ये योगविषयक उपक्रम राबविण्यात आला. इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन आणि महाराष्ट्र योगशिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांचा वाढदिवस आणि शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असे निमित्त साधून योगविषयक उपक्रम राबविण्यात आला. श्रीमती पुष्पावती बाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत निसर्ग विद्यानिकेतन निसर्गोपचार व योग अकादमीच्या प्राचार्य डॉ. तस्मिना शेख यांचे योगाभ्यासावर व्याख्यान झाले. तसेच सूर्यनमस्काराचे धडेही देण्यात आले. यावेळी त्यांनी निसर्ग उपचाराची माहिती आणि सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिकासह फायदे समजावून सांगितले.
यावेळी पुष्पावती बाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत निसर्ग विद्यानिकेतन निसर्गोपचार व योग अकादमीच्या सचिव सुनिता पाटील व उपाध्यक्ष रणजीत पाटील, तसेच फिजिओथेरपिस्ट प्रशांत धुमाळ, संतोष पाटील, परिचारिका साक्षी ढोले हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. पी. म्हसकर यांनी स्वागत केले. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी योगासनांची धडे घेतले. उपशिक्षक एम. आर. बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले.
—