नाशिक : प्रतिनिधी
योगा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र योगशिक्षक संघ आयोजित व आदीयोग महाविद्यालय यांच्या सौजन्याने महायोगोत्सव नाशिक 2022 निमित्त राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन झाले. चिन्मय आश्रम, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी, नाशिक येथे हा सोहळा झाला.
या स्पर्धेसाठी विविध वयानुसार 10 गट तयार केले होते. यातून राज्यभरातून 155 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थ याप्रमाणे पारितोषिक दिले जाणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना त्यांचे पारितोषिक नाशिक योग संमेलनात दिले जाणार आहे.
या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी डॉ. संजय गवळी, प्रा. पिराजी नरवाडे, महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, उपाध्यक्ष व राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष राहुल येवला, राज्य समितीचे संघटन सचिव जीवराम गावले, नाशिक जिल्हाध्यक्ष यू . के. अहिरे, संमेलनाध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील, राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, शर्मिला डोंगरे, डॉ. अंजली भालेराव, अर्चना दिघे, अनुष्का खळदकर, नेत्रा पवार उपस्थित होते.
योगासन स्पर्धा समिती प्रमुख दिपाली लामधाडे यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. मंदार भागवत यांनी सूत्रसंचालन केले. किशोर भंडारी यांनी आभार मानले.
—
—