नाशिक : प्रतिनिधी
अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमश्रद्धेय कानिफनाथजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने ऑनलाईन आरती शुभारंभ सोहळा हस्ते (ता. दिंडोरी) येथे झाला. दिंडोरी तालुका सेवा समितीचे सचिव रामेश्वर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ढोल-ताशाच्या गजरात भजनी मंडळ, निशाणधारी पुरूष, कलशधारी महिला यांच्यासह पूर्ण गावातून माऊलींची पालखी मिरवणूक थाटामाटात काढण्यात आली होती. महिलांनी रांगोळ्या काढल्या होत्या. योजनेच्या बाबतीत दिंडोरी तालुक्यातील पहिली अशी आरती झाली. प्रवचनकार संतोष थोरात महाराज यांचे प्रवचन झाले व सांगता आरती होऊन सर्वानी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी दिंडोरी तालुकाध्यक्ष रंगनाथ पारधी, दिंडोरी तालुका समिती, सेवा केंद्र समिती, आरती समिती, महिला सेना, संग्राम सेना, युवासेना,आजी-माजी पदाधिकारी, तसेच 500 ते 700 भक्त, शिष्य, साधक उपस्थित होते.
—