नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद येथे भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. प्राचार्य एल. डी. आवारे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्या के. के. वारुंगसे, पर्यवेक्षक बी. के. दातीर, ज्येष्ठ शिक्षिका व्ही. एन. रायते, व्ही. व्ही. पाटील, एस. के. उशीर, एम. एस. डोखळे, एस. आर. घोटेकर, ए. बी. दिघे उपस्थित होते. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रज्ञा आहिरे हिने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कार्याविषयी विचार मांडले. युगांत चौधरी याने इंग्रजी भाषेमधून विचार मांडले. संजीवनी विधाते हिने सूत्रसंचालन केले. इयत्ता ९ वी फ च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका एस. आर. घोटेकर व ए. बी. दीघे यांचे मार्गदर्शन लाभले.
—