नाशिक : प्रतिनिधी
तेजग्यान ग्लोबल फाऊंडेशन, पुणे अंतर्गत नाशिक विभागातर्फे `बर्निंग डिजायर शिबीरʼ येथील गंगापूर रोडवरील रावसाहेब सभागृहात उत्साहात झाले.
तेजग्यान ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्रीच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दशकांपासून पुणेस्थित मनन आश्रम, सिंहगड रोड येथे मानवता मंदिर व उच्चतम विकसित समाज निर्माण कार्य सुरू आहे. त्यातंर्गतच फांउडेशनव्दारा जीवनोपयोगी विविध विषयांना स्पर्श करणारे विषय निवडून साधकांना प्रशिक्षण देण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून कोराना काळात संपूर्ण विश्व नैराश्यतेच्या गर्तेत लोटले गेले होते, अशा परिस्थितीतदेखील गुरूवरील विश्वास व्दिगुणीत करून साधकांनी ऑनलाईन शिबिरांचे आयोजन सुरु होते. त्याचा लाभ सर्वच साधकांनी घेतला. नाशिकमध्ये आयोजित या बर्निंग डिजायर शिबिरामूळे साधकांची नैराश्यतेची मरगळ स्वच्छ झाली. उपस्थित साधक व तेजसेवकांमध्ये उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.
कोरोना काळात निराशा, ताण-तणाव, अस्वस्थता, आळशीपणा, सततची आजारपणाची स्थिती यासारख्या गोष्टींचा गंज समाजातील प्रत्येकास लागलेला होता. या शिबिरामूळे हा गंज स्वच्छ तर झालाच शिवाय तेजगुरु सरश्रीच्या अमृतवाणीने सर्व साधक परिसस्पर्श झाल्यावर लोखंडाचे जसे सोन्यात रूपांतर होते, तसेच उपस्थित साधक विशेष शिदोरी घेऊन पुढील वाटचाल करतील, असा विश्वास उपस्थित सर्व साधकांमध्ये दिसला. नाशिकसह नागपूर, जळगाव व नगर या चार झोनमध्ये एकाच वेळी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीन हजार जणांनी या शिबिरचा लाभ घेतला.
—