`रोगमुक्त भारत अभियानʼच्या राज्य सहसंयोजकपदी डॉ. तस्मीना शेख

0

स्वामी शिवानंद यांच्यासह डाॅ. तस्मीना शेख.

नाशिक : प्रतिनिधी  इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन (आयएनओ)च्या `रोगमुक्त भारत अभियानʼच्या महाराष्ट्र राज्य सहसंयोजकपदी येथील डॉ. तस्मीना शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार यांनी ही नियुक्ती केली आहे. डाॅ. शेख या निसर्गोपचार व योगशास्त्राच्या अभ्यासक आहेत. तसेच नाशिकमधील प्रतिष्ठीत पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत.

`आझादी का अमृतमहोत्सवʼ अंतर्गत दिल्ली येथे `4 था प्राकृतिक चिकित्सा दिवसʼ समारंभात आयुष राज्यमंत्री डाॅ. महेंद्र मुंजापारा यांनी रोगमुक्त भारत अभियानाचा शुभारंभ नुकताच केला. या अभियानांतर्गत राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (एनआयएन) व आयुष मंत्रालय यांच्या सहकार्याने विविध उपक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे. यात 32 राज्यांतील 500 जिल्ह्य़ांत प्राकृतिक चिकित्सेच्या प्रचार-प्रसारासाठी निसर्गोपचार शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. `कौन बनेगा स्वस्थ रक्षकʼ (केबीएसआर) या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले जाईल. तसेच वार्ता हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 10 वाजता 15 ऑगस्ट 2022 पर्यंत होईल. 10 विविध ठिकाणी राष्ट्रीय, राज्यस्तरीय संमेलन व चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन (आयएनओ)द्वारा ई-सदस्यता अभियान 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू असेल. या उपक्रमांच्या संयोजनात डाॅ. तस्मिना शेख सहभागी असतील.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.