नाशिक : प्रतिनिधी
येथील नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन गुरुवारी (दि.27) रोजी होणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये सायंकाळी पाच वाजता या संमेलनास सुरुवात होईल, ही माहिती अकॅडमीच्या प्रमुख व गुरु सोनाली करंदीकर यांनी दिली.
गुरू सोनाली करंदीकरांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यालीच्या सुमारे १०० विद्यार्थिनींनी आपली भरतनाट्यम कला प्रेक्षकांसमोर सादर करतील.
२००३ मध्ये स्थापन झालेल्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जणाऱ्या नृत्याली भरतनाट्यम संस्थेच्या दोन्ही शाखा म्हणजे ईगल स्पोर्टस क्लब, नाशिकरोड आणि भावसार भवन, गोविंदनगर येथील शिष्या या संमेलनात सहभागी होतील.
—