नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या नाशिक येथील न्यू मराठा हायस्कूल, वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक छगन साळवे होते. व्यासपीठावर वाघ गुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे व ज्येष्ठ्य शिक्षक उपस्थित होते.
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्याविषयी विद्यार्थीनी प्रणवी चव्हाण, संस्कृती आहेर, दिव्या तिदमे, कल्याणी सांगळे, ईशान महाजन, आदिती थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. आर्या गायकवाड हिने `गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन गायन केले. तिला संगीताची साथ संगीत शिक्षक वैभव पिंगळे व विद्यार्थी यांनी दिली. शिक्षक मनोगतात उर्मिला ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांचा जीवन परिचय करुन दिला.
छगन साळवे यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा यांच्या कार्याची प्रेरणा दिली व स्वच्छतेचे महत्त्व संत गाडगेबाबा यांच्या कार्यातून मुलांना पटवून दिले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाळासाहेब गडाख, उर्मिला ठाकरे यांनी प्रयत्न केले. विद्यार्थी ईशानी थोरात व श्रृती पवार यांनी सूत्रसंचालन केले. किशोरी क्षीरसागर हिने आभार मानले.
—