नाशिक : प्रतिनिधी
शिक्षक व एनसीसी अधिकारी साहेबराव राठोड यांची नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ-मेरी हायस्कूलच्या शिक्षक प्रतिनिधीपदी व संस्थेच्या शिक्षक मंडळाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल.
इंग्रजी विषयतज्ज्ञ
राठोड हे गेल्या 24 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते इंग्रजी विषयतज्ज्ञ आहेत. अनेक कार्यशाळांतून त्यांनी 9 वी व 10 वीच्या इंग्रजी विषय शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.
एनसीसी ट्रूपचेही नेतृत्व
राठोड हे एनसीसीमध्ये 100 मुलांच्या ट्रूपचेही काम पाहत आहेत. 2007 पासून ते यावर कार्यरत आहेत. त्यांच्या हाताखाली शिकत असलेली मुले राष्ट्रीय स्तरावरील शिबीरातही सहभागी झाली आहेत. एनसीसी अधिकारी यांचे वेल्फेअर बोर्ड आहे. त्यावर राठोड हे विभागीय संघटक म्हणून काम पाहत आहेत. त्याअतंर्गत ते 5 जिल्ह्यांचे कामकाज सांभाळत आहेत.
अध्यात्मिक क्षेत्रात रस
राठोड हे वसंतराव नाईक अधिकारी-कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य ( ट्रेड युनियन) यांचे नाशिक जिल्हा सचिव आहेत. तेथे ते गेल्या दहा वर्षांपासून काम पाहत आहेत. तसेच ते अखिल भारतीय चैतन्य साधक समितीचेही नाशिक जिल्हा सचिव आहेत. त्यांना अध्यात्मिक क्षेत्रात रस आहे.
—