नाशिक : प्रतिनिधी
योगा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या नाशिक जिल्हा योग संमेलन अध्यक्षपदी योगतज्ज्ञ राहुल बी. येवला यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन पंचवटीतील चिन्मय मिशन, चिंचबन, पंचवटी येथे 17 मार्चला होणार आहे. संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. त्यात ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष जीवराम गावले होते.
महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन होत आहे. बैठकीस राज्य समितीचे विभागीय अध्यक्ष यू. के. अहिरे, जिल्हा समितीचे कोषाध्यक्ष अशोक पाटील, महासचिव गीता कुलकर्णी, राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, राज्य ग्रामीण प्रकोष्ठ तस्मिना शेख, पंचवटी विभागप्रमुख किशोर भंडारी, सचिव मंदार भागवत, योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
नियोजित अध्यक्ष राहुल येवला हे योगशास्त्रातील शिक्षणाच्या सर्व पायऱ्या पूर्ण करत एम. ए. (योगशास्त्र), योग अध्यापकपर्यंत त्यांचे औपचारिक शिक्षण झाले आहे. तसेच ते राज्य व राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धा परीक्षक म्हणून कार्य करत आहेत. ते उत्तम साधक व कुशल संघटक आहेत. चांदवड येथील एसएनजेबी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये ते योगतज्ज्ञ म्हणून ते कार्यरत आहेत.
—